🕒 1 min read
मुंबई : राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने (MNS) याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या.
मनसेकडून दरवर्षी या परिसरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी राज्य सरकारकडून परवानगी नसल्यानं मनसे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष बघायला मिळत आहे. मनसेकडून कृष्णजन्माष्टमीला मध्यरात्री 12च्या सुमारास नौपाडातील मनसे कार्यालयासमोर मानाच्या दहीहंडी दोन थर लावत दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी पोलिसांकडून 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त नौपाडातल्या मैदान परिसरात बघायला मिळत आहे. यासंदर्भात बोलताना अभिजीत पानसे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सणांच्या मागे लागण्याऐवजी सहाय्यक आयुक्तांच्या सुरक्षेकरिता हा बंदोबस्त लावावा तसेच ज्याने महिला अधिकाऱ्याची बोटं तोडली त्या व्यक्तीचे हात-पाय तोडले पाहिजेत अशी पानसे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- नितेश राणेंनी केले ‘ते’ वादग्रस्त ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चांना आले उधाण
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- ‘लोकांचा जीव वाचवणे पाप असेल तर मविआ सरकार हे पाप करत आहे, ‘ काँग्रेसच्या सीमा थोरातांचा भाजपवर पलटवार!

