Share

धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : राज्यात आता अनलॉक-३ नंतर सरकारने अटी व नियमांसह अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी देऊन ८० ते ९०% व्यवहार चालू करण्यास परवानगी दिली आहे. दारूच्या दुकानांना देखील परवानगी आहे मग धार्मिक स्थळं देखील लाखोंच्या उपजीविकेचे साधन असताना फक्त त्यांनाच बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय आहे? असा सवाल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थित केलाय. तुळजाभवाणी मंदिराबाहेर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली.

दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान व्यंकटेश्वरा मंदिर (तिरुपती बालाजी) ११ जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले असून मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेची सर्व खबरदारी घेवून भाविकांना आत प्रवेश दिला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी रोज १२००० भाविकांनाच दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. भाविकांना नोंदणी केल्यावर दर्शनाचा दिवस ठरतो व त्यादिवसातील वेळ कळवण्यात येते आणि आपल्या वेळेच्या १ तास आगोदर मंदिर परिसरात येण्याची परवानगी देण्यात येते. मा. सर्वोच्च न्यायालयाने देखील पर्युषण पर्व असल्याने जैन धर्मियांची मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे.

राज्यातील इतर प्रार्थना स्थळांसोबत तुळजापूर स्थित महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील गेली ५ महिन्यांपासून बंद असल्याने याठिकाणी पूजेला लागणारे साहित्य व फुलहार विक्री करून ज्यांची गुजराण चालते अशा हजारो नागरिकांच्या हातातोंडाशी येणारा घास बंद झाला आहे. भाविकांचा ओघ बंद असल्याने हाताला इतर कुठलेही काम नाही. त्यामुळे पैशांची येणारी आवक पूर्णपणे मंदावली आहे. दैनंदिन खर्चात कुठलीही बचत करता येत नसल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे व राज्यभरातील इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!