पुणे : काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यामुळे खळबळ उडाली होती. ‘लोकप्रतिनिधी त्रास देतात, प्रशासनातील वरिष्ठही हतबल असतात. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या झुंडी सतत धावून येतात.
वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडीत रोखता येत नाही. त्यांनी तर खिंडीत मदतीऐवजी मारेकरी पोहोचवले,’ असे शल्य व्यक्त करीत नगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी ११ मिनिटांच्या ऑडिओ क्लिपद्वारे आपली सुसाइड नोट जाहीर केली होती. परंतु आता ज्योती देवरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे.
देवरे यांनी तब्बल 5 कोटी 94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध लोकायुक्त मुंबई यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती अँड. असीम सरोदे यांनी दिली आहे. तक्रारदार राहुल झावरे यांच्यामार्फत देवरे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाळूचे ठेके व दंड सरकारकडे जमा न केल्याचा ठपका देवरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान देवरे यांनी प्रांताच्या अधिकार वापरल्याचा आरोप ही करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पर्यावरणाची हानी झाली आहे असून याला जबाबदार देवरे आहेत. त्या दोषी असतील तर लोकायुक्त त्यांना चौकशीसाठी बोलवतील, या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी करावी. देवरे यांनी तहसीलदार पदाचा धुळे येथे गैरवापर केला आहे. पण दंड न आकारताच वाळूच्या गाड्या का सोडल्या? असा सवाल अँड. असीम सरोदे यांनी उपस्थितीत केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल परब यांना मोठा धक्का; ‘खास’ अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा
- नितेश राणेंनी केले ‘ते’ वादग्रस्त ट्वीट डिलीट; उलटसुलट चर्चांना आले उधाण
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- मोदी सरकारने कष्टकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे; जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश -खा. कराड
- ‘ईडीने कारवाई करावी, मात्र भाजप नेत्यांनी आरोप केल्यानंतर ते कारवाई करत असतील तर याचा अर्थ…’


