Share

मोदी सरकारने कष्टकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे; जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश -खा. कराड

Published On: 

औरंगाबाद : नरेंद्र मोदी सरकारने कष्टकरी, शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या जनहिताच्या विविध योजनांची व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ .भागवत कराड यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मांजरी माहुली, मुद्देशवाडगाव, वाहेगाव, हैबतपूर येथील जनतेशी संवाद साधत नेवरगाव येथील संवाद सभेने यात्रेची सांगता करण्यात आली.

नेवरगाव येथे संकटेश्वराचे दर्शन घेऊन सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी नेवरगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने डॉ. भागवत कराड यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. सभेच्या प्रास्तविकात जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांनी मराठवाड्याचे भूमिपुत्र डॉ. भागवत कराड यांच्या केंद्रिय मंत्री मंडळातील समावेशाने दुर्लक्षित ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळेल अशी भावना व्यक्त करून नेवरगाव गटातील विविध गावातील रस्ते, पाणी, वीज, पीकविमा यांसह नागरीकांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांच्या संदर्भात मंत्री महोदयांना अवगत केले.

नेवरगाव गटातील वरील समस्यांचे टप्याटप्प्याने समाधान करण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून या भागातील रस्त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने व कार्याने प्रभावित होऊन जि.प सदस्य मधुकर वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगीचे सरपंच गणेश कारभार, हैबतपूरचे सरपंच राजेंद्र पवार, नेवरगावचे सरपंच नामदेव आघाडे, युवा कार्यकर्ते ॲड. गजानन सपकाळ, ॲड. भाऊसाहेब जाधव, किरण सोनवणे यासह वाहेगाव येथिल अनेक तरुणांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!