🕒 1 min read
अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता पत्रकारांवर निशाणा साधल्याचे समोर येत आहे. अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने लोकांना घाबरू नका असे आवाहन करत माध्यमांचे स्वातंत्र्य जपण्याची हमी दिली होती. परंतु त्यानंतर आता तालिबानचे खरे रुप समोर आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामध्ये एका टीव्ही पत्रकाराला जबरदस्तीने तालिबानची स्तुती करण्यासाठी सांगितले आहे.
मसिह अलिनेजाद या एका महिला पत्रकाराने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये घाबरू नका! अफगाणिस्तानातील न्यूज अँकरचे हे शब्द होते. तसेच हे म्हणतांना त्याच्यामागे दोन सशस्त्र तालिबानी स्टुडिओमध्ये उभे होते. या व्हिडिओला मसिहने कॅप्शन दिले आहे की,’हे अतिवास्तववादी आहे. तालिबानी दहशतवादी या टीव्ही होस्टच्या मागे बंदुका घेऊन उभे आहेत आणि त्याला सांगत आहेत की अफगाणिस्तानच्या लोकांनी इस्लामिक अमिरातला घाबरू नये. तालिबान लाखो लोकांच्या मनात भीतीचा निर्माण करत असल्याचा हा अजून एक पुरावा आहे’.
This is surreal. Taliban militants are posing behind this visibly petrified TV host with guns and making him to say that people of #Afghanistan shouldn’t be scared of the Islamic Emirate. Taliban itself is synonymous with fear in the minds of millions. This is just another proof. pic.twitter.com/3lIAdhWC4Q
— Masih Alinejad ????️ (@AlinejadMasih) August 29, 2021
दरम्यान, तालिबानी प्रवक्त्या मौलवी अब्दुलहक हेमाद याची मुलाखत घेणाऱ्या अफगाणी अँकर बेहेशता अरघंद यांनी देश सोडल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. तालिबानच्या प्रतिनिधीची थेट टीव्हीवर मुलाखत घेण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु त्यानंतर तालिबानच्या भीतीने देश सोडल्याची माहिती बेहेशता यांनी माध्यमांशी बोलतांना दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारनेच उत्सवांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले,’ आता मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का?
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘भाजपने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावं’; सतेज पाटलांचा खोचक सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
