🕒 1 min read
मुंबई : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.
यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. राज्य सरकार आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली आहे. उद्याच दहीहंडी असून मनसे आणि भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये दहीहंडी होणारच असा निर्धार केला आहे.
पुन्हा एकदा अटक..
हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार..
— avinash jadhav (@avinash_mns) August 30, 2021
ठाण्यात दहीहंडीचे आयोजन करणाऱ्या मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या ठिकाणी उद्या होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमाची तयारी सुरु होती तिथे दाखल होत पोलिसांनी जाधव यांना अटक केली आहे. अटकेनंतर अविनाश जाधव यांनी एक ट्विट केलं आहे. ‘पुन्हा एकदा अटक…हिंदू सणांसाठी शेवटपर्यंत लढणार!,’ असं म्हणत जाधव यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं जाहीर केलं आहे. मनसेसह भाजप नेते देखील दहीहंडी करण्यावर ठाम असल्याने उद्या संघर्ष होण्याची शक्यता आहे.
तुम्हाला पक्षांचे मेळावे, यात्रा, कार्यक्रम चालतात मग दहीहंडी का नको?
‘हिंदुविरोधी सरकारने जाहीरपणे आपण हिंदू सणांविरोधात आहोत हे जनतेला सांगावं.. तुम्हाला मेळावे, यात्रा, पक्षाचे कार्यक्रम चालतात मग दहीहंडी का नको? पोलिसांना प्रत्येक वेळी पुढे करून दडपशाही करण्यापेक्षा समोर येऊन बघा.. मग बघू कसे सण साजरे होत नाहीत? सर्व नियम पाळून आम्ही हिंदू सण साजरे करण्याचा प्रयत्न करतोय.. उद्यावर दहीहंडी आली आणि सरकारने मला कुठलीही नोटीस न देता अटक करण्यासाठी पोलिसांना पाठवणं कितपत योग्य आहे… हि दडपशाही का? कायद्याचं राज्य कि फायद्याचं राज्य?’ असे सवाल करत अविनाश जाधव यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
https://www.facebook.com/avinashjadhavmnsofficial/videos/563776578399937/
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी सरकारनेच उत्सवांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले,’ आता मोदींविरोधात भाजप आंदोलन करणार का?
- उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या टीमकडून लूटमार सुरू-किरीट सोमय्या
- विजय वडेट्टीवार दारुच्या नशेत बोलतात का ? तुषार भोसलेंचा हल्लाबोल
- ‘बिरोबाच्या खोट्या शपथा घेतल्या तर त्याचं पार वाटोळं होतं’, जयंत पाटलांचा पडळकरांना टोला
- ‘भाजपने १०० टक्के लसीकरणासाठी शंखनाद आंदोलन करावं’; सतेज पाटलांचा खोचक सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
