Share

शासनाने तत्काळ अनुकूल निर्णय घ्यावा, नसता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल- आमदार सावे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यभरातील मंदिरे खुली करावीत या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरातही गजानन महाराज मंदिरासमोर भाजपने आंदोलन केले. मंदिरे खुली करण्यासंदर्भात शासनाने तत्काळ अनुकूल निर्णय घ्यावा, नसता राज्य सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा या वेळी आमदार अतुल सावे यांनी दिला.

या संदर्भात आमदार सावे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘मंदिरे बंद, बार चालू ! नागरिकांची अध्यात्मिक भावना आणि श्रद्धेचा विचार करता तात्काळ मंदिरे खुले करावी यासाठी श्री गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिरावर उदरनिर्वाह असणारे सर्वसामान्य कर्मचारी, पुजारी, लघु व्यवसायिकांची नाराजी किमान शंखनाद आंदोलनातून तरी राज्य सरकार पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. शासनाने तात्काळ अनुकूल निर्णय घ्यावा नसता जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.’

मंदिरे खुली करण्याच्या मुद्यावरुन भाजप राज्यभर आंदोलन करत आहे. मंदिरावर अनेकांचा उदरनिर्वाह आधारीत आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे राज्यात मद्यालये, हॉटेल आणि इतर सर्व व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत, त्याच प्रमाणे मंदिरे खुली करुन त्या आधारीत व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मुभा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!