Share

‘सत्तेत आल्यापासून ठाकरे हिंदू शब्दच विसरलेत,’ मनसेचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शासनाने कोरोनामुळे उत्सवांवर बंदी घातलेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उत्सव साजरा करण्यासाठी ठाण्यामधील भगवती मैदानामध्ये आज सकाळपासून आंदोलन सुरु केलं आहे. दरम्यान मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना आंदोलन सुरु असतानाच ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी अविनाश जाधव यांनी असा कोणता करोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे लक्षात ठेवा, असे म्हणत त्यांनी सत्तेत आल्यापासून उद्धव ठाकरे हिंदू हा शब्दच विसरले आहेत, अशी टीका जाधव यांनी केली आहे. आता भाजपा सत्तेत असती तर उद्धव ठाकरेंनीच हिंदू हिंदू केलं असतं. मात्र सत्तेत आल्यापासून ते हिंदू शब्दच विसरले असल्याचा टोला जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

दरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयानंतर ठाण्यातील शिवसेनेमार्फत आयोजित केले जाणारे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आले. मात्र, मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला असून नियम पाळून हा उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!