🕒 1 min read
पुणे : नुकत्याच पार पडलेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रा याने भालाफेक या क्रीडाप्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. देशभरात त्याचे कौतुक केले जात असून आता नीरच चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलंय. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला.
दरम्यान, भालाफेकीला ऐतिहासिक दृष्ट्या देखील खूप जास्त महत्व आहे. परकीय आक्रमण परतवून लावण्यासाठी भालाफेकीचा देखील उपयोग केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील स्वराज्य स्थापन करताना भालाफेकीची फौज वापरली होती. याबाबतचा उल्लेख देखील राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात केला.
‘ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. स्वामी रामदास, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे’, असं भाष्य राजनाथ सिंह यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केला.
जिस भूमि पर आज हम सभी लोग उपस्थित हुए हैं, इसका इतिहास देखिए आप। यह खेल ही था जिसने एक शिवा नाम के बच्चे को छत्रपति शिवाजी महाराज बना दिया। गुरु रामदास, दादोजी कोंड देव और माता जीजाबाई ने बचपन से ही खेल-खेल में ऐसी शिक्षाएँ उन्हें दीं, जिसने उन्हें एक राष्ट्र-नायक में बदल दिया:RM
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) August 27, 2021
दरम्यान, आर्मीतील 23 खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व खेळाडूंचं राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग, कर्नल राजवर्धनसिंह राठोड, कॅप्टन विजयकुमार यांच्या परंपरेत आता सुभेदार नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं आहे, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं. तसेच, ज्या ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं ते देखील आमच्यासाठी विजयी आहेत. काहींचं थोडक्यात पदक हुकलं असलं तरी त्यांच्या कामगिरीचा सर्व देशवासियांना अभिमान आहे’, असं देखील राजनाथ सिंह यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आता भाजप ऍक्शन मोडमध्ये; अनिल परब यांच्याविरोधात याचिका दाखल करण्याचं काम सुरु
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्या बंद दाराआड भेटीवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- कोरोना इफेक्ट! शिक्षण क्षेत्रावर अवकळा; अकरावी प्रवेशातही गडबड गोंधळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
