🕒 1 min read
नवी दिल्ली- भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे एमडी आणि सीईओ सलील पारेख यांना समन्स जारी केले आहेत. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांना 23 ऑगस्ट 2021 रोजी नवीन ई-फाइलिंग पोर्टल लाँच झाल्यानंतर 2.5 महिन्यांनंतरही त्यासंबंधीच्या अडचणी अजून दूर का झाल्या नाहीत हे स्पष्ट करण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
21 ऑगस्ट 2021 पासून प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी प्राप्तिकराचे नवीन ई-फाइलिंग पोर्टल उपलब्ध नाही.नागरिकांना आपलं प्राप्तीकर विवरण पत्र सुलभतेनं भरता यावं या दृष्टीनं भारतीय प्राप्तीकर विभागासाठी इन्फोसिस कंपनीने विकसित केलेलं ई फायलिंग पोर्टल नीट काम करत नसल्याचं आढळून आल्याने सर्वसामान्य करदात्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना तोंड द्याव लागत आहे. हे पोर्टल तात्पुरतं बंद करत असल्याची घोषणा प्राप्ती कर विभागाने ट्वीटर संदेशाद्वारे केली आहे.
दरम्यान, प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाची प्रक्रिया सुलभ, सोपी आणि गतिमान व्हावी या उद्देशाने 7 जून रोजी ई-फायलिंग वेबसाईट सुरु केली. मात्र, ही वेबसाईट करदात्यांसाठी त्रासदायकच ठरल्याचे दिसून येत आहे. यामुळेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत आज चर्चा करण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदी-शहांचा पराभव निश्चित, फक्त ‘चर्चा पे चर्चा’नकोत’, संजय राऊतांचा विरोधी पक्षांना सल्ला
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार
- गुन्हे मागे ; बैलगाडा मालकांनी जल्लोषात केला गृहमंत्री वळसे पाटलांचा सत्कार
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
