Share

पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाचा मधल्या फळीतील फलंदाज फवाद आलमने शतक झळकावले आणि यासह त्याने पाकिस्तान संघासाठी इतिहास रचला आहे. त्याला एक दशकाहून अधिक काळानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे.

फवाद आलम कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच शतके करणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज बनला आहे. फवादने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत रविवारी ही कामगिरी केली. डावखुऱ्या फलंदाजाने आपल्या 22 व्या डावात पाचवे कसोटी शतक झळकावले. फवादच्या आधी पाकिस्तानचे माजी कर्णधार युनूस खान यांनी देशासाठी ही कामगिरी केली होती.

युनूस खानने 28 डावांमध्ये 5 शतके केली होती. त्याचबरोबर सलीम मलिकने कसोटी क्रिकेटमध्ये पाकिस्तानसाठी 29 डावांमध्ये 5 शतके केली. याशिवाय फवाद आलम किंग्स्टनमधील सबिना पार्कमध्ये शतक झळकावणारा पाकिस्तानचा सहावा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी इम्तियाज अहमद, वजीर मोहम्मद, आसिफ इक्बाल, युनूस खान आणिइंजमाम उल हक  यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध शतके केली होती.

35 वर्षीय फवाद आलम कसोटीत पाच शतके झळकावणारा आशियाचा सर्वात वेगवान फलंदाज बनला आहे. या प्रकरणात त्याने चेतेश्वर पुजारा, सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांना मागे सोडले आहे. पुजाराने 24 डावांमध्ये पाच शतके आणि गांगुली आणि गावस्कर यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!