🕒 1 min read
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त केंद्रीय मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेस निघाले आहेत. त्यांच्या या यात्रेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी लक्ष्य केलं असून आज पुण्यात पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपच्या या यात्रेवर निशाणा साधलाय.
‘देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष देण्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही. पेट्रोल डिझेलने सेंच्युरी पार केली असून आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जनतेचा आशिर्वाद मागत असावेत,’ असा टोला लगावत पटोलेंनी जन आशीर्वाद यात्रेचा समाचार घेतला.
यासोबतच, ‘या यात्रेदरम्यान भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल,’ अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेस पुढे गुडघे टेकून शिवसेनेनं महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला’; भाजपची जहरी टीका
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- ‘वॉर्डनिहाय आरक्षणामध्ये फक्त स्त्री-पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे- राज ठाकरे
- ‘आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका’; राज ठाकरेंच रोखठोक भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
