🕒 1 min read
पिंपरी चिंचवड: भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता यावरूनच काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री सचिन सावंत यांनी भाजपवर निशाना साधला आहे.
मोदी सरकारच्या दबावाने काही जणांना आरोप करायला लावून महावसूली महावसूली अशी बोंब ठोकत मविआ सरकारची बदनामी करणारा भाजपाच वसूलीबाज सिध्द झाला आहे. अशी टीका करत त्यांनी भाजपाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष नितीन लांडगे याला सहा जणांसहीत लाचखोरीच्या आरोपांखाली अटक झाली आहे.असे म्हटले आहे.
मोदी सरकारच्या दबावाने काही जणांना आरोप करायला लावून महावसूली महावसूली अशी बोंब ठोकत मविआ सरकारची बदनामी करणारा भाजपाच वसूलीबाज सिध्द! भाजपाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष नितीन लांडगे याला सहा जणांसहीत लाचखोरीच्या आरोपांखाली अटक झाली आहे.#वसूलीबाज_भाजपा
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 19, 2021
दरम्यान आता स्थायी समितीच्या अध्यक्षांनी तातडीने राजीनामा तर दिलाच पाहिजे ,शिवाय भाजप चे चंद्रकांतदादा पाटील यांनी तातडीने यावर स्पष्टीकरण द्यायला हवे. पिंपरी चिंचवड मधील सत्ताधारी भाजप हे आधीच्या सत्ताधाऱ्यांपेक्षा वेगळे कसे हे पण सांगावे अशी मागणी आप आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली, सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार’; भाजपचा टोला
- ‘महाविकास आघाडीचे सरकार जाणार हे फडणवीसांचे दिवा स्वप्न’, बाळासाहेब थोरातांचा टोला
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- ‘मोदी २०१४ लाच अफगाणिस्तानात का नाही गेले’, चाकणकरांचा खोचक सवाल
- भाजपला ‘जन आशीर्वाद’ महागात पडला; कल्याण डोंबिवलीत 4 गुन्हे दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
