Share

‘वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच’, मंत्री अमित देशमुखांची माहिती

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत वर्ग ३ पदभरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वर्ग ४ बाबतची पदभरती अधिष्ठातांनी आपल्या स्तरावरून करावी, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या बांधकामाच्या अनुषंगाने मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी २०१७ मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला होता.

या करारानुसार तीन वर्षांसाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्यक ती यंत्रसामग्री उपलब्ध केली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी जळगाव अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश देशमुख यांनी दिले.

दरम्यान,  कोरोना काळात राज्यातील सर्वच विभागातील डॉक्टरांनी काम केले आहे. त्यामुळे या सर्वांना समान काम समान वेतन मिळावे याबाबत वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असेासिएशन (निमा)च्या विविध प्रश्नांसंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

यावेळी देशमुख म्हणाले की, सर्वच विभागातील डॉक्टरांना समान काम आणि समान वेतन मिळावे यासाठी विभाग आग्रही आहे. याशिवाय शासन अनुदानित आयुर्वेदिक महाविद्यालयाबरोबरच खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील इंटर्न विद्यार्थ्यांनाही समान विद्यावेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. ‘निमा’वर प्रशासकही लवकरच नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!