नांदेड : मराठवाड्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मराठवाड्याचेच नाही तर राज्यातील प्रलंबीत सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले. ‘जनआर्शिवाद’ यात्रेनिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. मी केवळ मराठवाड्याचा नेता नाही तर महाराष्ट्राचा नेता असल्याचेही ते म्हणाले.
विभागीय आयुक्तांमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मराठवाड्यातील प्रलंबीत विकास कामांचा प्रस्ताव तयार करायला लावणार आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत केंद्राकडे पाठवायला लावून ती सर्व कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासानही त्यांनी दिले. मराठवाडाच नाही तर राज्यातील सर्व भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात कोरोना काळात आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. या विभागाला जास्त निधी द्यावा लागला असला तरी इतर मंत्रालयातील कामेही जास्त काळ खोळंबणार नाहीत, तसे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. देशात लसीकरण मोहिम मोदींच्या नेतृत्त्वामुळेच यशस्वी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. कोरोना नंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- पनवेलमध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण मोहिम, सुरक्षा रक्षक आणि मोलकरणीचेही होणार लसीकरण
- ममतांना हायकोर्टाचा धक्का! बंगाल हिंसाचाराचा तपास सीबीआय करणार
- पिंपरी चिंचवड : भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष ACB च्या जाळ्यात
- ‘आम्ही कोणालाही शिंगावर घ्यायला तयार, मग ते राज ठाकरे असो वा कोणीही’
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

