🕒 1 min read
औरंगाबाद : शहरात स्मार्टसिटी बस सुरु होऊन वर्ष उलटली, सुरुवातीला संपूर्ण शहरात धावणारी स्मार्टबस कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान, बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर काही मार्गांवर सुरु करत बस थेट करमाड पर्यंत पोहचली. परंतु शहरातील बेगमपुरा, जयसिंगपुरा परिसत ती जात नसल्याने नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून कैफियत मांडत आहे.
शहर बस सुविधा शहरवासीयांना सोयीने मिळावी म्हणून केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात बस सेवा सुरु केली. उद्घाटनासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला होता. शहर बसचे थांबे सुद्धा निश्चित केले होते. त्या वेळापत्रकानुसार बस काही महिने चालते न चालत कोरोना संसर्गाने बसची चाके पुन्हा थांबवली. दुसरी लाट ओसरताच काही अंशी बस सेवा सुरु करत, ठराविक मार्गावर स्मार्टसिटी बस सुरु झाली.
दरम्यान, ठराविक मार्गाचा विस्तार करत, प्रशासनाने बस सेवा करमाडपर्यंत विस्तारित केली. परंतु, शहरातील जगतील स्तरावरील असलेल्या पर्यटन स्थळांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेगमपुरा, पहाडसिंगपुरा भागात अद्याप बस सेवेचा विस्तार करण्यात न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासकांकडे ते कैफियत मांडत, बस सेवा सुरु करण्याची मागणी करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अवयवदान करत समाजासमोर ठेवला आदर्श
- ‘देवमाणुस’ परत येणार? अपुर्ण कथानकामुळे चर्चेला उधान
- धक्कादायक : भारतात कोविशील्डच्या बनावट लसी; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा
- स्टीव्ह स्मिथ आणि ऍरोन फिंच टी-२० विश्वचषकात पुनरागमन करणार?
- ‘लिंगसमभावाच्या दृष्टीने पडलेले हे एक महत्त्वाचे पाऊल’, सु्प्रीम कोर्टाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंकडून स्वागत


