🕒 1 min read
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीच्या कारवाईविरोधात संरक्षण मिळावं, याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे ईडीनं पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे.
दरम्यान ईडीकडून अनिल देशमुख यांना बजावलेलं हे पाचवं समन्स आहे. बुधवारी सकाळी ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याअगोदरही ईडीने अनेक समन्स बजावले आहे. मात्र अनिल देशमुख उपस्थित नाही राहिले. त्यामुळे यावेळी ते उपस्थित राहतील का, असा सवाल आता केला जात आहे.
तब्बल चार वेळा अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, चारही वेळा समन्स बजावून देखील देशमुख यांनी कोर्टातील याचिकेचा हवाला देत चौकशीला उपस्थित राहणे टाळले. त्यामुळे आता पाचव्यांदा समन्स बजावून देखील जर देशमुख ईडीच्या चौकशीस सामोरे गेले नाहीत तर ईडीकडून देशमुखांभोवती फास आवळला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या
- आता ६५ केंद्रांवर लसीकरण, मनपाकडे १८ हजार लसींचा साठा शिल्लक
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती-बावनकुळे
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
