नवी दिल्ली : तालिबानने अफिगाणिस्तानवर कब्जा करत आपला झेंडा फडकावला आहे. तालिबानने स्वत:ला अफिगाणिस्तानचे नवे सरकार म्हणून घोषित केलं असलं तरीही फेसुबकने तालिबानविरोधात मोठी कारवाई केली आहे. तालिबानच्या समर्थनार्थ जी काही फेसबुक अकाउंट्स असतील ती सर्व अकाउंट्स फेसबुकने बंद केली असल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आली आहेत.
‘आमच्या धोरणांनुसार, दहशतवादी संघटनेला आमच्या प्लॅटफॉर्ववर स्थान दिले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत तालिबान किंवा त्याच्याशी संबंधित कोणतेही अकाऊंट, पोस्ट फेसबुकवर दाखवली जाणार नाही’, असे फेसबुकने जारी केलेल्या परिपत्रकामध्ये म्हंटले आहे. अफगाणी भाषा समजण्यासाठी काही अफगाणी भाषा तज्ञांची नियुक्तीही केली आहे.
जगभरातील इतर देश तालिबान्यांना स्वीकारण्यास तयार नाहीत. जगभरातून राष्ट्र प्रमुखांच्या प्रतिक्रिया, अफगाणिस्तानमधील चिघळलेली परिस्थिती तालिबान्यांना विरोध करण्यास पुरेशी आहे. फेसबुकनेही तालिबानला आपल्या प्लॅटफॉर्मवरून बॅन केलं आहे. ‘अमेरिकन कायद्यांन्वये तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे आम्ही त्यांची सेवा बंद करत आहोत’, असं फेसबुकच्या प्रवक्तांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तुम्ही दिल्लीतून तिकीट आणणार, पण निवडून कसे येणार?’, पंकजा मुंडेंचा स्वपक्षातील नेत्यांना धमकीवजा इशारा
- कौतुकास्पद : एका दिवसात सर्वाधिक लसीकरण करत भारताने केला नवा विक्रम
- राजकारणातील शूर्पणखा होणार नाही याची काळजी घ्या?
- ‘मुंबई ते औरंगाबाद बुलेट ट्रेन माझे स्वप्न ; ते नक्कीच पूर्ण करुन दाखवणार ‘ , रावसाहेब दानवेंचा विश्वास!
- शिवसेनेचे आमदार, महापौरांचे डम्पिंगविरोधात ठिय्या आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
