बीड : सोमवारी बीड येथे भाजपच्या एक दिवसीय कार्यकारिणी बैठक व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियान कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बीड जिल्ह्यातील भाजप आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, सत्ता असताना आपण विकासावर लक्ष केंद्रित केले. आज सत्ता नसताना पक्ष संघटन, विस्तारावर आपण लक्ष दिले पाहिजे. भाजपसाठी हा काळ पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. कार्यकर्त्यांनी आपली निष्ठा बाटू देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच त्यांनी यावेळी बीड जिल्ह्यातील स्वपक्षातील नेत्यांनाही खडेबोल सुनावले. ‘सत्तेच्या काळामध्ये माझ्या मागेपुढे फिरून करोडो रुपयांची कामे मिळवली तेच लोक माझ्याबद्दल व पक्षाबद्दल नाराजीचा सूर काढतात. काही लोकांनी आपली निष्ठा खुंटीला बांधली. नेता भेटेल तसे फोटो बदलतात. पक्ष हे माझे घर आहे. याकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहू नये. काही लोक दिल्लीतून तिकीट मिळविण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, निवडून येण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार’ असा धमकीवजा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
भाजप सरकारने दिलेले मराठा आरक्षण आघाडी सरकारला टिकवता आले नाही, तर ओबीसीचे पारंपरिक राजकीय आरक्षण देखील या सरकारने घालविले. आगामी काळात या दोन्ही समाजाला न्याय मिळविण्यासाठी बीड जिल्ह्यातून संघर्ष उभा करणार असून, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी पुष्पहार स्वीकारणार नाही, तर ओ.बी.सी.चे आरक्षण पुन्हा कायम झाल्याशिवाय फेटा बांधणार नाही, अशी प्रतिज्ञा पंकजा मुंडे यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
