🕒 1 min read
उल्हासनगर : शिवसेनेचे आमदार, महापौरांनी आज दि.१७ ऑगस्ट उल्हासनगरातील कॅम्प ५ भागात असलेल्या डम्पिंगच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. महत्वाचे म्हणजे या महानगरपालिकेवर शिवसेनेचीच सत्ता असून देखील शिवसेनेवर डम्पिंगविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील आकाश कॉलनी परिसरात एका बंद पडलेल्या खदानीत उल्हासनगर महापालिकेकडून तात्पुरते डम्पिंग करण्यात आले आहे. मात्र, या डम्पिंगचा स्थानिकांना मोठा त्रास होत असून कचऱ्याच्या सतत ये-जा करणाऱ्या गाड्या, दुर्गंधी, तसेच डम्पिंगमधून वाहून येणारा कचरा इत्यादी समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेला मलंगगड पट्ट्यातील उसाटणे गावाजवळ ३० एकर जागा डम्पिंगसाठी मोफत देण्यात आलेली असतांना देखील तिथे डम्पिंग उभारलेले नाही. त्यामुळे शिवसेनेकडून महापालिका प्रशासनाचा निषेध केले जात आहे.
दरम्यान, आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई आशान यांच्यासह शिवसेनेचे सगळे पदाधिकारी डम्पिंगच्या परिसरात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करायला बसले. यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी महापालिकेने उसाटणे डम्पिंगबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कचऱ्याची एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘परळीतील त्या अंगार, भंगारवाल्या घोषणा मी ऐकल्याच नाहीत’, मंत्री भागवत कराडांची प्रतिक्रिया
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- नाराजी कायम! मंत्री भागवत कराडांच्या जनआशीर्वाद यात्रेकडे मुंडे समर्थकांची पाठ
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
