🕒 1 min read
औरंगाबाद : पावसा अभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागास दिले. सोयगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील शेतक-यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहेत. पावसा अभावी मका पीक करपत असून सोयाबीनची पाने-फुले गळत असल्याचे चित्र आहे.
तसेच पावसाअभावी तालुक्यातील कापूस, तूर इत्यादी सर्वच पिके धोक्यात आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील फर्दापुर व सावळदबारा सर्कलचा दौरा करून जंगला तांडा, जामठी, घाणेगाव, नंदा आदी ठिकाणी जावून येथील पिकांची पाहणी केली. त्यासोबतच येथील काही शेतक-यांशी संवाद साधून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी पावसा अभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसुल तसेच कृषी विभागास दिले.
यावेळी जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, तहसीलदार रमेश जसवंत, शहर प्रमुख संतोष बोडखे, उस्मान पठाण, तालुका उपप्रमख गुलाबराव कोलते, मा.सभापती धरमसिंग चव्हाण, बाबू चव्हाण, शिवाप्पा चोपडे, दारासिंग चव्हाण, रविंद्र बावस्कर, रशीद पठाण, विलास वराडे, सिताराम जाधव, गणेश खैरे, राधेश्याम जाधव, बाळू पाटील, सुरेश चव्हाण, हिरा चव्हाण आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या सॅम करणच्या नावे जमा झाला ‘हा’ लाजीरवाना विक्रम
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती-बावनकुळे
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’

