Share

‘पुणे कुण्याच्या बापाचं नाही’; मनसेच्या इशाऱ्याला कोकाटेंनी दिलं प्रत्युत्तर, वाद वाढणार ?

Published On: 

पुणे : संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि मनसेमध्ये शाब्दिक कलह सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात हजेरी लावली होती. तेव्हा राज ठाकरेंनी जाती व्यवस्थेवरुन अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यानंतर प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले होते.

प्रवीण गायकवाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे यांनी लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा सज्जड दम संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना दिला होता. आता याला श्रीमंत कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘पुणे कुण्याच्या बापाचं नाही,’ असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध संभाजी ब्रिगेड असा वाद वाढण्याची शक्यता आहे.

मनसेने प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरु देणार नाही असं म्हणणं हास्यास्पद आहे. पुणे कुण्याच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जो जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल तो व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, तो शिवरायांचा शत्रू आहे,’ असं श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलं आहे.

वसंत मोरे नेमकं काय म्हणाले होते ?

‘2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छुक असणारा तू, मी स्वत: गल्लोगल्ली फिरताना तुला पाहिलंय. मी प्रवीण गायकवाड, असे सांगत होतास. तुला राज ठाकरे काय कळणार? लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू,’ असा इशारा वसंत मोरे यांनी दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!