सांगली : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसरी लाट अधिक भयंकर असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज असल्याने प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी ठेवावी. असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना सद्यस्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारी व प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तीसऱ्या लाटेत दिडशे पट रुग्णसंख्या वाढेल असा तज्ज्ञांचे मत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयार ठेवावी, ऑक्सिजन साठवण क्षमता व ऑक्सिजन जनरेशन प्लांट या बाबत योग्य नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
यासोबतच, तिसऱ्या लाटमध्ये दोन हजारच्यावर ऑक्सिजन रुग्ण्संख्या झाल्यास परत लॉकडाऊन होणार याची स्पष्ट कल्पना त्यांनी दिली. पहिल्या लाटे प्रमाणेच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने अशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांना अधिक लवकर निदानासाठी मोटीव्हेट करावे, मोहिम स्वरुपात प्रत्येकाने काम करावे, लक्षणे दिसू लागताच टेस्टिंग करुन औषधोपचार सुरु केले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजनसाठी टास्क फोर्स तयार करावा, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तातडीने औषध साठा करुन ठेवावा, गर्दी टाळण्यासाठी व संसर्ग टाळयासाठी दुकानदारांनी घरपोच डिलिव्हरी साठी मॅक्यानिझम तयार ठेवावा अशा सूचना त्यांनी वेळी दिल्या. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती नंतर पूरपश्चात परिस्थितीचा आढावा घेतला यामध्ये 38 हजार 494 पंचनामे पुर्ण झाले आहेत. पशुधानाचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. 39 हजार 400 कुटुंबाना धान्य वाटप झाले आहे. 39 हजार 695 हेक्टर कृषी क्षेत्राचे पंचनामे पुर्ण अंतिम झाल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली शिवशाहीर पुरंदरे यांची भेट; शिवसृष्टीची केली पाहणी
- ‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- मुख्यमंत्र्यांकडून स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात झाली चूक; भाजप आमदार म्हणाला, ‘अभ्यासू आणि ब्येष्ट’
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- ‘असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल’

