🕒 1 min read
मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मराठी मालिकेतील पाठकबाई अर्थातच अभिनेत्री अक्षया देवधर आणि राणादा म्हणजे हार्दिक जोशी या जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपलेसे स्थान निर्माण केले आहे. सध्या या मालिकेने प्रेक्षकांची रजा घेतली असली तरी आजही यातील कलाकरांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे. नुकेतेच अक्षया आणि हार्दिक यानी एकत्र फोटोशूट केले असून ते सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
https://www.instagram.com/p/CSiqObKDbH1/?utm_medium=copy_link
राणा आणि अंजलीने आपल्या इन्स्टाग्रामवर हे काही फोटो शेअर केले आहेत. या दोघांना पुन्हा एकत्र पाहून चाहते देखील चांगलेच खुश झाले आहेत. या फोटोमध्ये दोघांनी यामध्ये पारंपारिक आणि वेस्टर्न कॉम्बो लुक केला होता. या फोटोवर सध्या लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.
सध्या अक्षया देवधर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सोशल मिदियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तर दुसरीकडे हार्दिक जोशी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या मालिकेत प्रेक्षकांना तो वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेचा गणेशोत्सव मंडळांना दिलासा !
- इंग्लंडचा कर्णधार जो रुटने गाठला मैलाचा टप्पा, द वॉल द्रविडला टाकले मागे
- माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री ठाकरेंनी केलं अभिवादन, म्हणाले…
- ‘जसं 370 कलम हटवलं, तसंच…’; संजय राऊत यांची थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी
- सनातन धर्माचे ज्ञान देणाऱ्या नेटकऱ्यांना कंगणाने दिले सडेतोड उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
