Share

पासपोर्ट मिळणे होणार सोपं आणि जलद; आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येच करता येणार अर्ज

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. विशेषत: जन्म तारखेवरील वादावरुन अनेकदा पासपोर्ट मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अनेकांना पासपोर्ट मिळण्यास वेळ लागतो. मात्र, परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे पासपोर्ट मिळण्यास अधिक सोपं आणि जलद होणार आहे.

यासंदर्भात इंडिया पोस्टनं एक ट्वीट करत म्हंटले होते की, ‘आता आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये सीएसी काउंटरवर पासपोर्टसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये भेट द्या.’  त्यामुळे आता भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट बनविण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. देशभरात 424 पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या सुविधेसाठी नागरिकांना आपल्या जवळील पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्विस सेंटरमध्ये जावं लागणार आहे.

पासपोर्टचा अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी सोबत असणे महत्त्वाचे आहे. याकरिता त्या व्यक्तीचे आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा कोणतंही फोटो असलेलं वैध ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड, जन्माचा दाखला आणि शाळा/कॉलेज सोडल्याचा दाखला सोबत असणे गरजेचे आहे. त्याच बरोबर घरचा पत्ता असणारे ओळखपत्र दाखविण्यासाठी वीज बिल, पाणी बिल, मोबाईलचा बिल तसेच बँक खाते, पासबुक, भाड्याचे अॅग्रीमेंट तुमच्या सोबत असले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे पासपोर्ट अर्ज सादर करण्यासाठी पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक आहे.

पासपोर्टसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया- 

  • पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट passportindia.gov.in वर लॉगइन करा.
  • पासपोर्टसाठी अर्ज लागणारा फॉर्म ऑनलाईन भरा.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर मूळ दस्तावेज आणि पासपोर्टसाठी दाखल केलेल्या फॉर्मची प्रिंट घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा.
  • अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची पडताळणी आणि योग्य ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 7 ते 14 दिवसांमध्ये पासपोर्ट जारी केला जातो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!