मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिन्याभरापासून जोर धरू लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर उद्या कोविड टास्क फोर्सची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई लोकल सुरु करण्यासंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. सामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेन मधून प्रवास करायला मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष आहे. दोन लस डोस पूर्ण झालेल्यांना लोकल प्रवास मुभा द्यावी ही मागणी केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांना देखील वेळ वाढवून हवी आहे. राज्यातील कोरोना रुग्ण संख्या आणि विविध भागात काय सूट दिली जाऊ शकते याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
तसेच पुढील 2 महिन्यांत बरेच सण आणि उत्सव असल्याने हा काळ संसर्गाच्या दृष्टीने धोकादायक आहे. यापूर्वी निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ झाली होती. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर लोकल संदर्भात काय निर्णय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नसल्याने नियमांचे पालन करणे हिताचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळेना, आमचं तसं नाही’; चंद्रकांतदादांची जहरी टीका
- ‘राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो’; राणेंची खोचक टीका
- ‘न्यायाच्या या मार्गावर आम्ही ‘ती’च्या सोबत आहोत,’अशोक चव्हाणांचे आश्वासन
- ‘महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, १६ ऑगस्टनंतर…,’ नारायण राणेंचा इशारा
- आर्या आंबेकरच्या रिमिक्स गाण्यावर चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
