🕒 1 min read
मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात मागील वर्षापासून भरती निघाली आहे. त्यातच आता महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये तब्बल 3466 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. त्यामुळे इछुक उमेदवारानी या पदासाठी काम करण्यासाठी चांगली संधी ठरू शकते.
महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये गट-ड च्या जागांसाठी ही भरती असणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2021 असणार आहे. तर 09 ऑगस्ट 2021 पासून अर्ज करण्याची प्रकिया सुरू होणार आहे. या पदभरतीसाठी https://www.arogyabharti2021.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता आणि आधिक माहिती जाणून घेऊ शकता.
ठाणे, पालघर, अलिबाग रायगड, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, जालना, परभणी, औरंगाबाद, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा, गोंदिया आणि चंद्रपूर हे या नोकरीचं ठिकाण असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नीरजच्या यशानंतर मिल्खा सिंग यांच्या मुलाने व्यक्त केली भावना, म्हणाला…
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
