Share

‘राहुल गांधी हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो’; राणेंची खोचक टीका

Published On: 

नवी दिल्ली : २०१४ पासून भाजपची केंद्रात सत्ता आहे. मोदी लाटेची किमया २०१९ मध्ये देखील कायम राहिली आणि सर्वाधिक यश मिळवत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म ला सुरुवात झाली आहे. याकाळात विरोधी पक्षांचे अस्तित्व हे कमजोर पडल्याचे दिसून आले होते. आता मात्र शेतकरी आंदोलन, पेगासस प्रकरण आदी मुद्द्यांवरून विरोधकांची मोठ्या प्रमाणात एकजूट होत आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ केल्यामुळे बहुतांश कामकाज हे झालंच नाही. तर, विरोधकांनी एकजूट करून मोदी सरकारवर हल्लाबोल करत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह देशातील इतर भाजप विरोधी पक्ष देखील एकवटल्याचं दिसून आलं. तर, महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद धुमसत असल्याचं अनेकदा समोर आल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची चांगलीच जवळीक वाढल्याचं पाहायला मिळालं.

राहुल गांधी हे संजय राऊत यांच्यासोबत खांद्यावर हात टाकून चर्चा करत असल्याचा फोटो देखील समोर आला. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘राहुल गांधी ज्या पक्षावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो.’ असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. यासोबतच, लोकांना महाविकास आघडी सरकारबाबत सामनातून सांगण्यासारखं काहीही नाही. त्यामुळेच ते केंद्र सरकारवर विनाकारण टीका करत असतात, असं देखील नारायण राणे यांनी भाष्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!