🕒 1 min read
मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा ऑलिम्पिक प्रवास संपुष्टात आला आहे. उपांत्य फेरीच्या पराभवानंतर कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनकडून देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला हॉकी संघाला पदक जिंकण्याची संधी होती. मात्र अत्यंत चुरशीच्या या लढतीत भारतीय संघाला ब्रिटनकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारताविरुद्ध विजय मिळवलेल्या ब्रिटन संघाने देखील महिला संघाचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट करत भारतीय महिला संघाचे मनोबल वाढवले आहे. या ट्विटमध्ये ब्रिटनने, ‘खुपच उत्कृष्ट सामना होता आणि आमचा प्रतिस्पर्धीही तितकाच उत्कृष्ट. भारतीय महिला हॉकी संघ, तुम्ही टोकियो ऑलिम्पीकमध्ये खुप उत्कृष्ट खेळ केला आहे. तुमचे भविष्य खुपच उज्ज्वल दिसत आहे.’ अशा शब्दात ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला हॉकी संघाचे मनोबल वाढवले आहे.
What an amazing game, what an amazing opponent ????@TheHockeyIndia you've done something special at #Tokyo2020 – the next few years look very bright ???? pic.twitter.com/9ce6j3lw25
— Great Britain Hockey (@GBHockey) August 6, 2021
भारतीय हॉकी संघाच्या ट्विटर हँडलने हे ट्विट शेअर करत ‘खरचं हा खुप चांगला सामना होता. कांस्यपदक जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन’ असे ट्विट केले आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्या सामन्यात पराभुत झाल्यानंतर भारताने कांस्यपदकाच्या लढतीत ४-३ असा पराभव स्विकारला.
Right back at you. It was a brilliant game. ????
Congratulations on the Bronze Medal, @GBHockey. https://t.co/sz7BNEu9DR
— Hockey India (@TheHockeyIndia) August 6, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत
- मोठी बातमी : बार्सिलोनाला लियोनेल मेस्सीचा रामराम ; संपवले 21 वर्षाचे नाते
- पराभुत महिला हॉकी संघाला शाहरुख खानने दिला ‘हा’ संदेश, म्हणाला..
- ‘नुकसानग्रस्तांना भरीव मदत न दिल्यास फार मोठ्या आक्रोशास सरकारला सामोरे जावे लागेल’
- ’10 वर्षांनी टीव्हीवर पुनरागमन करतेय’ ; आगामी मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
