🕒 1 min read
मुंबई : इंधनदरवाढीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सर्वसामान्य जनता इंधनदरवाढीमुळे हैराण झाली असताना आता देशात इंधनदरवाढीच्या सत्राला ब्रेक लागन पेट्रोलच्या किंमती ५ रुपये प्रतिलिटर कमी होण्याची शक्यता आहे. कारण क्रूड ऑयलचं उत्पादन वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे याचा फायदा होऊन पेट्रोलच्या किंमती कमी होऊ शकतात.
आयआयएफएल सिक्युरिटिजचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता म्हणाले की, बेंचमार्क ब्रेंट क्रूड ज्यामध्ये काही दिवसांपूर्वी वाढ 77 डॉलर प्रति बॅरल झालं होतं. क्रूड ऑईलचं उत्पादन वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती ६५ डॉलर प्रति बॅरल कमी होऊ शकतात. जर असं झालं तर त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पेट्रोल ४ ते ५ रुपये प्रतिलिटर कमी होईल. परंतु हा फायदा ऑयल मार्केटिंग कंपन्याकडून याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार की नाही ही पाहावे लागणार आहे.
पेट्रोलच्या दरांत चार मेनंतर 41 वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये 37 वेळा वाढ झाली, तर एकदा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लिटरनं महाग झालं आहे. डिझेल राजस्थान, ओदिशा आणि मध्यप्रदेशातील काही शहरांमध्ये 100 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
