बीड : आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ही तिसरी लाट, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी किंवा तरुणांसाठी नसून, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जनतेला लुटले त्यांच्यासाठी आलेली असून जे बांधव घरावर तुळशीपत्र ठेवून आठ महिने ऊस तोडण्यासाठी बाहेर जातो त्याला कोरोना शिवला नाही. ही ईश्वरी ताकद असून देव आहेच हे आपल्याला मान्यच करावे लागणार आहे असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
आष्टी येथे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळात उकृष्ट काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर बोलत होते. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. इंदुरीकर महाराज म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. कोरोनाकाळात डाॅक्टर, पोलिस व समाजिक संस्था हेच खरे कोरोना योद्धे आहेत. ज्यांनी कोरोनात एक तरी पेशंट वाचवला तर त्यांना काशी, देवधर्म करायची गरज नाही.
साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी गाथेत लिहिलेले आता २०२१ मध्ये खरे होत आहे. कोरोनाने कुणालाच सोडले नाही. सध्या सृष्टीवर असलेले आजार दूर करण्यासाठी झाडे लावा, नदी वाचेल, नदी वाचली तर सगळेच वाचतील आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्यामुळे सर्वांनी एक तरी झाड लावा आणि जगावरचे संकट दूर करा असा उपदेश इंदुरीकर महाराज यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार होते ना! दादा.. क्या हुआ तेरा वादा?’, चित्राताईंचा अजित पवारांना चिमटा
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
