मुंबई : दक्षिण मुंबईतील गजबजलेला भाग असलेल्या वरळीच्या बीडीडी चाळींचा लवकरच कायापालट होणार आहे. 10 बाय 10 च्या खोल्या असलेल्या वरळीकरांना लवकरच आलिशान फ्लॅट मिळणार आहे. वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून इमारतींचं बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना शरद पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे तोंड भरून कौतुक केले असल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘आजि सोनियाचा दिनु… कष्टाकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागतोय. महाराष्ट्रावर गेले अनेक दिवस एकापाठोपाठ एक संकटे येतायत, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकटातही त्यावर मात करण्याची हिम्मत दाखवली,’ अशा शब्दात शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले आहे.
‘अलीकडे महाराष्ट्रावर काही ना काही सातत्याने संकटं येत आहेत. एक मोठं अतिवृष्टीचं संकट राज्यावर आले, हजारो घरं पडली, अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, होतं नव्हतं ते वाहून गेलं, पण एक गोष्ट चांगली आहे, या संकटावरही मात करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्याचंच फलित म्हणजे आजचा कार्यक्रम, म्हणून एका बाजूने या पूरग्रस्त घरांची बांधणी करणे हे सरकारसमोर आव्हान आहे.
दुसरीकडे मागील 100 वर्षापासून या मुंबईमध्ये कष्ट करुन महाराष्ट्राला आणि देशाला आर्थिक शक्ती देण्यासाठी ज्यांनी घाम गाळला त्या सगळ्या कष्टकऱ्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचं पाऊल पडतंय, याचा मला मनोमन आनंद होतोय.’ असे स्पष्ट मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘थप्पड से डर नहीं लगता… अशी एक झापड देऊ, पुन्हा कधी उठणार नाही!’, मुख्यमंत्री ठाकरे संतापले
- नुकसानग्रस्तांसाठी फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, केल्या तब्बल २६ मागण्या
- ‘भविष्यात मोदी कृपेने स्वतःच्या पैशाकडे पाहण्यासाठीही पैसे लागू नयेत म्हणजे मिळवलं!’
- ‘पकडापकडीचा खेळ खेळणारे मोदी सरकारला आव्हान देताहेत’, भाजपचा शरद पवारांना टोला
- मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट, बीडचा फैसल खान अटकेत

