🕒 1 min read
नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात काँग्रेस खासदार राहुल गांधी स्वतः ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले आहेत. त्यांनी आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांना पाठींबा दिला आहे. राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ कॉंग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमावर शेअर करत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
देशातील अन्नदातासोबत राहुल गांधी मैदानात उभे आहेत. या अन्नदात्यांचा आवाज ते संसदेत मांडत आहेत. त्यामुळे आता या तानाशाही सरकारने हे लक्ष्यात घ्यावे की ,’न देश का अन्नदाता दबेगा, न अन्नदाता की आवाज दबेगी’ अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भ्रमात राहू नये. शेतकऱ्यांचा आवाज काँग्रेस आणि राहुल गांधी भक्कमपणे मांडत आहेत.
देश के अन्नदाता की मांगों के समर्थन में राहुल गांधी जी मैदान में हैं, देश के अन्नदाता की आवाज संसद में बुलंद कर रहे हैं।
तानाशाही हुकूमत सुन ले- न देश का अन्नदाता दबेगा, न अन्नदाता की आवाज दबेगी।#RahulGandhiWithFarmers pic.twitter.com/BvNhKBwgfX— Ashok Chavan (@AshokChavan1958) July 26, 2021
‘मी शेतकऱ्यांचा आवाज संसदेत मांडला आहे. २-३ मोठ्या उद्योजकांसाठी असलेला हा काळा कायदा सरकारला रद्द करावाच लागणार असे राहुल गांधी यांनी आंदोलनात म्हटले आहे. सध्या शेतकरी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून आहेत. तसेच राहुल गांधी यांच्या सहभागाने या आंदोलनाला अजून जोर मिळाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योद्धा जेव्हा शरण येत नाही…’, आ.धसांनी महिलेचे हॉटेल पाडल्यानंतर समर्थकांची पत्रकबाजी
- ‘राज ठाकरेंसोबत युतीची चर्चा झाली का?’, फडणवीस म्हणाले…
- झारखंडमध्ये आमदार खरेदी प्रकरण; प्रतिक्रियेसाठी फोन केल्यावर बावनकुळे म्हणाले, ‘ऐकू येत नाही..’
- मोठी बातमी! दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आग; राज्यपालांच्या खोलीचे मोठे नुकसान
- मोठी बातमी! झारखंड काँग्रेस आमदार खरेदी प्रकरणात भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
