Share

‘कोल्हापूर शहर आता कोणत्याही संकटाला सामोरं जायला सज्ज’ – खासदार संभाजीराजे

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. काल दिवसभरात कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 97 बंधारे अजूनही पाण्याखाली असून पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 52 फुटांवर येऊन पोहोचली आहे. शुक्रवारी रात्री हीच पातळी 56 फुटांवर होती, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका निर्माण झाला होता.

खासदार संभाजी राजे यांनी आज कोल्हापुरातल्या पूर्वपरिस्थितीची पाहणी केली आहे. ‘कोकणात NDRF ची टीम वेळेवर पोहोचली असून लोकांचे प्राण वाचले आहेत. २०१९ मध्ये कोल्हापुरात पूर आला होता आणि सगळंच वाहून गेलं होतं. तशीच परिसथिती आता निर्माण झाली आहे. २०१९ साली आलेल्या महापुराचा फटका बसला होता, मात्र यंदा त्याची धास्ती नाही. कोल्हापूर शहर आता कोणत्याही संकटाला सामोरं जायला सज्ज आहे. ‘ असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

संभाजी राजेंची या वेळेस काही महत्वाच्या मुद्द्यांना प्राध्यान्य दिलं आहे. कोलापूरमध्ये शाश्वत विकास केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आपत्कालीन स्थितीत शहराबाहेर पडता येत नाही त्यासाठी महामार्गावरील हायवे ग्रीन कॉरिडॉर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोबतच तंत्रज्ञानाचा वापर केले पाहिजे, दरवर्षी महापूर येणार, उपाययोजना केल्या पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान आता पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरच मोठ संकट टळलंय. दरम्यान राधानगरी धरण हे आज शंभर टक्के भरण्याची शक्यता असून त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडल्यानंतर पंचगंगा नदीत पुन्हा पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!