Share

‘कोरोना आणखीन गेला नाही, नियमांचे पालन करा’, पंतप्रधान मोदींचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या कोरोना महामारीमुळे भारताचे तसेच जगाचे मोठे नुकसान होत आहे. जीवीतहानी देखील झाली. तसेच आरोग्य विभागाने आणि भारताच्या प्रतिभावान डॉक्टरांनी मिळून कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यात यश मिळवले. लसीकरण, कोरोना चाचण्यावर भर दिला. आज ‘मन की बात’ मध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आवाहन केले की कोरोना आणखीन गेला नाही, नियमांचे पालन करा’.

तसेच त्यांनी सांगितले की, रुग्ण संख्या कमी जरी झाली असली तरी कोरोनाचे संकट आणखीन टळलेले नाही. कार्यक्रम, उत्सव टाळा आणि नियमांचे पालन करा. तसेच लसीकरण करा असे देखील आवाहन मोदींनी यावेळी केले. त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजयीत्या मीराबाई चानूचे अभिनंदन केले आणि खेळाडूंचा उत्साह वाढवणे गरजेचे आहे असे सांगितले. देशात स्वतंत्राचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्या अनुशंगाने मोदींनी ‘ नेशन फर्स्ट, अॉलवेज फर्स्ट’ या मंत्रासह आपल्याला पुढे जायचे आहे असे सांगितले .

दरम्यान, गेल्या 24 तासात भारतात 58,419 नवे कोरोना रुग्ण आढळले. दैनंदिन नवे कोविड -19 रुग्ण आढळण्याच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. सलग 13 व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी दैनंदिन नव्या रुग्णांची नोंद झाली. केंद्र आणि राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या निरंतर आणि एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहेत. भारतात सक्रिय रुग्ण संख्येतही सातत्याने घट होताना दिसत आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आज 7,29,243 आहे. तसेच भारतात लसीकरण मोहीम देखील वेगाने राबवली जात आहे. एकट्या महाराष्ट्रात ४ कोटी २० लाख पेक्षा अधिक लसीकरण झाले. तज्ञांच्या मते भारतातील प्रत्येक नागरिकाला येत्या वर्षाच्या पहिल्या महिन्या पर्यंत लसीकरण झालेले असेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!