औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदिवासी खावटी अनुदान योजने अंतर्गत दि.२२ गुरुवार रोजी फर्दापूर (ता.सोयगाव) येथील आदिवासी कुटुंबांना किराणा सामान व कडधान्याचे वाटप करण्यात आले यावेळी फर्दापूर येथील १०८ आदिवासी तडवी भिल्ल कुटुंबातील पात्र लाभाथ्र्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.कोरोना काळात आदिवासी कुटुंबांना अर्थसाहाय्य करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने आदीवासी खावटी अनुदान योजना महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय जाहीर करुन या योजनेअंतर्गत आदिवासी समाजातील प्रत्येक कुटुंबाला ४ हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार राज्यात आदिवासी खावटी अनुदान योजनेच्या अमलबजावणीची सुरुवात करण्यात आली.
या पाश्र्वभूमीवर फर्दापूर येथील तडवी भिल्ल समाजाच्या १०८ पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंबांना जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आदिवासी विकास प्रकल्प विभाग औरंगाबाद यांच्या वतीने मटकी,चवळी,हरबरा,वटाणा,तूरडाळ,उडीद डाळ, हे कडधान्य व मीठ,गरम मसाला,शेंगदाणा तेल,मिरची पावडर,चहा पावडर,साखर असे प्रत्येकी १८ किलो किराणा सामानाच्या किट वाटप करण्यात आल्या.
दरम्यान, आदिवासी खावटी अनुदान योजनेअंतर्गत फर्दापूर येथील १०८ पात्र आदिवासी कुटुंबांच्या बँक खात्यात आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदानाची रक्कम या अगोदरच जमा करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास प्रकल्प तसेच औरंगाबादचे माध्यमिक शिक्षक डि.आर महाले यांनी यावेळी दिली. फर्दापूर येथील पात्र लाभार्थी आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप करतांना सरपंच शकीलाबी शेख हुसैन माजी जि.प सदस्य डि.एफ सोनवणे आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबादचे डि.आर महाले,व्हि.आर चव्हाण ग्रा.पं सदस्य भीमराव बोराडे,फिरोज पठाण,गुलाब बर्डे सामाजिक कार्यकर्ते शेख शेख जाकेर आदींची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात घरगुती वीज ग्राहकांचे मीटर होणार ‘स्मार्ट’; मुंबईसह प्रमुख महानगरांत बसविले जाणार स्मार्ट मीटर
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- पुण्यातील भिडे पुलात जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

