Share

‘भविष्यातही संघर्ष करावा लागणार’, पतीच्या अटकेनंतर शिल्पाची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राला अश्लील चित्रपटांची निर्मिती करुन मोबाईल अॅपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राला कोर्टाने सुनावली २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत बॉली वूड मध्ये एकच खळबळ उडाली. अनेक सेलीब्रिटीनी या बाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या, मात्र शिल्पा शेट्टीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. परंतु नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एका पुस्तकाच्या पानाचा फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CRo7MHass6X/?utm_source=ig_embed&ig_rid=78058c95-32f5-4bda-9efd-7ab42ee8f4df

पतीच्या अटकेनंतर तिने  इंस्टाग्राम स्टोरीवर  जेम्स थर्बरच्या उद्धरणावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातील पानावर लिहिले की, “रागात मागे पाहू नका अथवा भीतीने समोर पाहू नका, त्याऐवजी जागरूकतेनं पाहा. आपण रागात, ज्या लोकांनी आपल्याला दुखावले आहे, जी निराशा आपण अनुभवली आहे, जे दुर्दैव आपण सहन केले आहे, याकडे मागे वळून पाहतो. आपण अशा शक्यतांना घाबरतो, की आपली नोकरी जाऊ शकते, आजार होऊ शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची गरज आहे, ते हेच आहे. आता काय झाले आहे किंवा काय होऊ शकते याकडे चिंताग्रस्त होऊन पाहू नका, पण काय आहे याची जाणीव असू द्या.”

पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, “मी जिवंत राहण्यासाठी भाग्यशाली आहे, हे जाणून, मी दीर्घ श्वास घेतो. मी भूतकाळात आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही मी आव्हानांचा सामना करू शकतो. आज मला माझे जीवन जगण्यापासून विचलित करण्याची काहीही आवश्यकता नाही.” असे शिल्पाने शेअर  केलेल्या पानावर लिहिले आहे. यावरून सध्या शिल्पा या परिस्थितीतून स्वतः ला शिल्पा कसे सावरत आहे हे स्पष्ट होतय.

राजच्या या कृत्यामुळे शिल्पाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यावरून  शिल्पा शेट्टीला सतत प्रश्न विचारले जात आहेत. ‘पतीच्या कृत्याबद्दल तुला काही माहिती नव्हतं का?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!