🕒 1 min read
मुंबई : सध्या पेगासस स्पायवेअरची सगळीकडेच चर्चा आहे. इस्त्रायलच्या एनएसओ या फर्मवेअरने तयार केलेलं पेगासेस स्पायवेअर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. इस्रायली फर्म पेगाससद्वारे आपल्या देशातील काही मंत्री तसंच पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले असल्याचा दावा करण्यात येतोय.
पेगासस हे एक स्पायवेअर आहे. इस्त्रायलच्या NSO ग्रुपने हे स्पायवेअर बनवलं आहे. हे स्पायवेअर ज्यांच्या फोनमध्ये टाकण्यात आल्याची शक्यता असलेल्यांची एक यादी सध्या लीक झाल्याची माहिती आहे. ‘भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर आहे. याप्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
‘इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचं सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी लोकांना नाही. जर खाजगी लोकांना विकण्यात आले नाही तर केंद्र सरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली?’ असा सवाल नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
‘केंद्र सरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिकार्याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे.’ असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान याच प्रकरणाचे पडसाद आज संसदेतही पाहायला मिळाले. मोदी सरकारमध्ये नवनिर्वाचित माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संबंधित आरोप आणि अहवालावर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
‘काल रात्री एका वेबपोर्टलद्वारे एक खळबळजनक वृत्त प्रसारित करण्यात आलं. यात अनेक आरोप करण्यात आले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच हे असे अहवाल प्रकाशित होतात हा काही योगायोग असू शकत नाही’, अशी रोखठोक भूमिका अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत मांडली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पेगासस’ प्रकरणावर मोदी, शाहांनी स्पष्टीकरण द्यावे; संजय राऊतांची मागणी
- ‘आमची मुंबई’चे ढोल बडवणारे सेलेब्रिटी आता कोणत्या बिळात लपले?’
- ‘जालन्यात काँग्रेस पक्ष टिकवणाऱ्या आ.कैलास गोरंट्याल यांना मंत्री करा’, समर्थकांची मागणी
- ‘ठाकरे सरकारमध्ये नेते कमी अन् बोलके पोपटच जास्त’, ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा टोला
- ओबीसींना संघटित करून अधिक सक्षम करणे हेच आपले अंतिम ध्येय-देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
