Share

‘गिलच्या बदली खेळाडूचा निर्णय निवड समिती घेणार’, गांगुलीने केले स्पष्ट

Published On: 

मुंबई : भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जखमी झाल्यामुळे तो भारतात परतला आहे.

मात्र अद्यापही बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाने गीलच्या जागी बदली खेळाडूची निवड केलेली नाही. यासंदर्भात बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला प्रश्न विचारला असता. हा निर्णय संपुर्णपणे संघ व्यवस्थापन आणि निवड समिती घेत असते. आपण त्यात लुडबूड करत नाही असे स्पष्ट केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघात गीलच्या जागी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कलची मागणी केली होती. मात्र निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी याबद्दल कोणताच निर्णय घेतला नाही.

जर निवड समितीने बदली खेळाडू नाही पाठवला तर रोहित शर्मासोबत मंयक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय उपलब्ध आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला असुन यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरनाची लागण झाली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग असल्याने महत्वाची मालिका मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!