Share

श्रीलंकेविरुद्ध धवनला ‘हे’ विक्रम करण्याची नामी संधी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अनेक अडथळ्यानंतर अखेर भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला आज सुरुवात होणार आहे. प्रमुख खेळाडूच्या अनुस्पथितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा संघ लंकादहन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद हे राहुल द्रविडकडे सोपवण्यात येणार आहे.

भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर असल्यामुळे शिखर धवन भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. तसेच या दौऱ्यात शिखर धवनला अनेक विक्रम नोंदवण्याची संधी आहे. पहिला विक्रम आहे तो कर्णधार पदाचा विक्रम. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधीक वय असलेला कर्णधार म्हणून पदार्पण करण्याचा विक्रम शिखर धवन नोंदवेल. यासह एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध १००० धावा पुर्ण करण्यासाठी धवनला केवळ १७ धावांची गरज आहे. जर त्याने हा विक्रम केला तर श्रीलंकेविरुद्ध सर्वात कमी डावात १००० धावा करणारा तो फंलदाज ठरेल.

तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पुर्ण करण्यासाठी धवनला ३५ धावांची गरज आहे. सध्या धवनच्या नावे कसोटीत २,३१५ धावा, एकदिवसीयमध्ये ५,९७७ आणि टी-२० क्रिकेटमध्ये १,६७३ धावा आहेत. तसेच पहिल्या सामन्यात जर धवनने २७ धावा केल्या तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या ६००० धावा पुर्ण होतात. अशी कामगिरी करणारा तो दहावा भारतीय खेळाडू ठरेल. तसेच सर्वात जलद ६००० धावा करणारा तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!