Share

‘पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्रीपदी, मग राष्ट्रवादी कोणामुळे सत्तेत ?’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सवाल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे.

राज्यातील सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर मतभेद आणि वाद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. असाच वाद खेडसह शिरूरमध्ये देखील सुरु असल्याचं पाहायला मिळतं. २०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर देखील या दोन्ही नेत्यांमध्ये वाद कायम असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे.

आता पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरुन या दोघांमधील श्रेयवाद हा चांगलाच तापला आहे. नारायणगाव आणि खेड घाट बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन होते. मात्र त्यापूर्वीच म्हणजे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हे उद्घाटन उरकून टाकलं. यामुळे हा वाद चर्चेत आला असून काल अमोल कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांना रोखठोक उत्तर दिलं आहे.

‘मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदावर आहेत, कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे,’ असं विधान करत अमोल कोल्हे यांनी केलं होतं. यावरून आता शिवसेनेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘पुण्याच्या शिरुर लोकसभा मतदारसंघाचे बळे बळे खासदार अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडले आहेत आणि आपल्या बुद्धीचे सामूहिक दर्शन घडवले आहे. अमोल कोल्हे म्हणतात शरद पवार यांच्या आशीर्वादाने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री , मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत?,’ असा सवाल शिवसेना प्रवक्ता किशोर कान्हेरे यांनी केला असून त्यांनी अमोल कोल्हे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!