🕒 1 min read
श्रीलंका : बऱ्याच अडचणीनंतर अखेर भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला आज सुरुवात होणार आहे. प्रमुख खेळाडूच्या अनुस्पथितीत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा संघ लंकादहन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर भारतीय संघाचे प्रशिक्षक पद हे राहुल द्रविडकडे सोपवण्यात आले आहे.
शनिवारी आज १८ जुलै रोजी पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्याची पहिली मॅच कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. या मैदानतल्या खेळपट्टीच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर पहिल्या वनडेमध्ये मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे, या खेळपट्टीवर बॉलर्सना कठोर मेहनत करावी लागणार असल्याचं चित्र दिसत आहे.
प्रेमदासा स्टेडियममध्ये अखेरच्या 10 वनडेमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमचा सरासरी स्कोअर 285 रन आहे, यातल्या दोन मॅचमध्ये 350 पेक्षा जास्त स्कोअर झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा स्कोअर होण्याची शक्यता आहे. मागच्या 10 मॅचपैकी 6 मॅच पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने जिंकल्या, त्यामुळे टॉस जिंकून कॅप्टन पहिले बॅटिंगचा निर्णय घेऊ शकतो.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चेतन सकारियाला यावेळी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मनिष पांडे, संजु सॅमसन या खेळाडूंचे संघात पुनरागमन होईल. तसेच श्रीलंकेकडूनही ४-५ खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करतील अशी आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पगार नसल्याने चिकटटेप विकावा लागणाऱ्या शिक्षकाला दरेकरांचा मदतीचा हात, राज्य सरकारवर टीका
- योगी महाराजांनी ‘तो’ कायदा लावलाच तर भाजपचे १६० आमदार बाद होतील; संजय राऊतांचा खोचक टोला
- शाब्बास ! ‘या’ कारणासाठी दहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास; उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
- सावधान! श्रीलंकेचे ‘हे’ खेळाडू करु शकतात धवनसेनेचे दहन
- ‘भाजप ही वॉशिंग मशीन इथे डाकू पण साधू होतात’ ; राष्ट्रवादीचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
