Share

अखेर कोल्हापूर जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश; सर्व प्रकारचे दुकाने होणार सुरु

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यानंतर कोरोनाची स्थिती ही उर्वरित महाराष्ट्रात आटोक्यात येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती मात्र चिंताजनक होती. यामुळे इतर जिल्ह्यांतील निर्बंध हटवल्यानंतर देखील कोल्हापुरातील निर्बंध हे कायम ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात तीन मंत्री असताना देखील कोरोना आटोक्यात आणण्यात प्रश्नासनाला अपयश येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.

तर यावर्षी देखील जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ व्यापार व दुकाने बंद ठेवावी लागल्यामुळे व्यापाऱ्यांसमोर उपजिविकेसह वीजबिल, इतर कर आदी मुळे आर्थिक विवंचना निर्माण झाली होती. पालकमंत्री खुद्द कोरोना काळात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांसाठी आग्रही होते. या निवडणुकांमुळेच जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अधिक बिकट झाली आणि त्यानंतर कडक निर्बंध लादण्यात आले असा संताप कोल्हापूरकर व्यक्त करत होते.

मागील दीड महिन्यामध्ये अत्यावश्यक वगळता इतर दुकाने खुली करण्यावरून जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार मग पोलीस किंवा लष्कर आलं तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी घेतली होती. यानंतर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेत स्थिती चिंताजनक नसल्याचं म्हटलं. त्यानंतर अखेर जिल्हा प्रशासनानं महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सोमवारपासून उघडली जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने त्याबाबत आदेश काढले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यामुळे जिल्हा प्रशासनानं सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 9.7 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दुकाने सोमवारपासून सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!