Share

‘संजय राठोड यांना क्लीन चीट देण्याचा संबंधच नाही’; गृहमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यभरात गाजलेल्या एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट मिळेल अशी शक्यता निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पुणे पोलिसांसमोर तरुणीच्या आई वडिलांनी जबाब नोंदवल्याची माहिती असून आमच्यावर कुणाचाही दबाव नाही आणि आमचा कोणावरही आरोप नाही, असा जबाब पूजा चव्हाणच्या आई वडिलांनी पुणे पोलिसांना दिला असल्याचं समजतं आहे.

पूजा चव्हाणच्या आई वडिलांच्या जबाबानंतर या संदर्भातील एक अहवालही पुणे पोलिसांनी राज्य सरकारला सोपवला असल्याची माहिती समोर येत आहे. राजीनाम्यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून बाहेर होते. त्यानंतर आता पुन्हा त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.

राठोड यांना क्लीनचीट देण्याबाबत काही वृत्तवाहिन्यांनी वृत्त दिल्यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आता याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य करताना क्लीनचीट देण्याच्या चर्चांना पूर्णविराम लगावला आहे.

‘संजय राठोड यांना क्लीन चीट नाही. त्याबाबतचा तपास सुरू आहे. दरम्यान, संजय राठोड प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणाला माहिती दिली याची मला माहिती नाही. पुणे पोलीस याचा तपास करत आहेत. त्याबाबतचा अहवाल आणखी आलेला नाही. त्यामुळे क्लीन चीट देण्याचा संबंधच नाही. अहवाल आल्यानंतर त्यावर भाष्य करता येईल,’ असं भाष्य वळसे-पाटील यांनी पुण्यात केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!