🕒 1 min read
पुणे : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून राज्यात सत्ता स्थापन केल्यापासून काही ना काही मुद्द्यांवरून आघाडीत बेबनाव असल्याचं वारंवार समोर येत आहे. तर, गेली दीड वर्षे हे सरकार स्थिरपणे चाललं असून पुढील पाच वर्षे देखील पूर्ण करेल असं नेते सांगत आहे. दरम्यान, राज्यात काँग्रेसने अधिक आक्रमक रूप धारण करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्या हाती सोपवली.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल पुण्यात बोलताना उघड नाराजी व्यक्त केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,’ असा टोला पटोलेंनी लगावला होता.
दरम्यान, स्वबळाचा नारा, पाळत ठेवण्याबाबतच विधान या मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत तणाव वाढत असून आता याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी देखील कबुली दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोलेंबाबत प्रतिक्रिया दिली.
‘नाना पटोले यांच्या वक्तव्यातून गैरसमज होतोय, हे खर आहे. परंतु, सर्वांना आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसेच, लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याबद्दलही दुमत नाही. मात्र, प्रतिक्रिया देताना, किंवा भूमिका मांडताना ती विचारपुर्वक मांडायला हवी,’ असा सल्ला देखील दिलीप वळसे-पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पटोले, चव्हाण, जगताप यांच्यावर आंदोलनानंतर गुन्हे दाखल केले का?’; नरेंद्र पाटलांचा सवाल
- ‘जे काँग्रेस नेते भाजपला घाबरतात त्यांना पक्षातून हाकलून द्या’, राहुल गांधींची सडेतोड भूमिका
- ‘इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब..’ अमृता फडणवीस यांचा शिवसेनेवर निशाणा
- ‘पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत, राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्यांना बळीचा बकरा करू नये’
- ‘भारत-पाकिस्तान चांगले शेजारी व्हावेत असं मला वाटतं, पण RSS ची विचारधारा आडवी येते…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
