Share

‘मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी सहकार्य केले!’, नारायण राणेंनी मानले आभार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : नुकताच मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यात महाराष्ट्रातील चौघांना मंत्रिपद देण्यात आले. पण या चौघांमध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली दोन नावे. नारायण राणे आणि भागवत कराड. शिवसेनेतून काँग्रेस आणि मग भाजपवासी झालेल्या राणेंना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. महाराष्ट्रातील चारही खासदारांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका मानली जाते.

पण प्रीतम मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारातून वगळण्यात आल्याने मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नवी दिल्ली येथे भेट घेत अभिनंदन केले आहे. यावेळी फडणवीसांनी सहकार्य केल्याबद्दल राणे यांनी त्यांचे आभार मानले.

याबाबत राणे यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. ‘महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे भेट घेऊन केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पदावर माझी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मीही त्यांचे आभार व्यक्त केले’ असे ट्विट राणे यांनी केले.

पंकजा मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज
‘आपण आपलं घर कशाला सोडायचं, ज्यावेळी छत अंगावर पडेल त्यावेळी पाहू. माझा नेता मोदी, माझा नेता अमित शाहा. आपण कशाला घाबरायचं?’ असं म्हणत पंकजा मुंडेंनी राज्य नेतृत्वाला नुकतेच सुनावले होते. त्यांचा इशारा हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच होता असा निष्कर्ष राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. यावर आता या प्रकरणावर रामदास आठवलेंनी भाष्य केले आहे. ‘पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मात्र, चर्चेतून ती नाराजी लवकरच दूर होईल’ असे आठवले म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!