Share

‘शरद पवारांना राष्ट्रपती पदासाठी उगीच बळीचा बकरा करू नका’ ; आठवलेंचा टोला

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना राष्ट्रपतीपदाचा चेहरा करण्यासाठी राजकीय रणनितीकर प्रशांत किशोर यांनी देशभरात मोर्चेबांधणी सुरू केली असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. ते सध्या देशभरातील दिग्गज नेत्यांच्या बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रेससोबतही याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपला धक्का देण्यासाठी प्रशांत किशोर रणनिती आखत असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘ शरद पवार हे धोकेबाज नेते नाहीत. ते देशाचे नेते आहेत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार पवार असतील‌ तर आमच्या शुभेच्छा असतील. मात्र, ते निवडून येणार नाहीत. त्यांना उगीच बळीचा बकरा करू नये’ असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.

शरद पवार यांचं नाव राष्ट्रपतिपदासाठी समोर आल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये चर्चांना ऊत आला आहे. पण, ‘राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवण्याबाबतची बातमी पूर्णपणे असत्य आहे’ असं म्हणत खुद्द शरद पवार यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शरद पवार यांनी खुलासा करत अद्याप काहीही ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे. तसंच मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचंही पवार म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!