Share

पंजाब नॅशनल बँककडून नोकर धारकांना मिळणार 3 लाखांचा लाभ

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात रोज नवनवीन बदल होत असतात यामध्ये ऑनलाईन बँकिंग मुळे तर अमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे अनेक बँक आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सुविधा घेऊन येत आहेत. या दरम्यान पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी देखील नोकरदार वर्गातील ग्राहकांना तीन लाखांची एक विशेष सुविधा घेऊन येत आहे.

याबाबत पीएनबीने ट्वीट करत लिहिले की, ‘तुमचा पगार चांगल्या पद्धतीने मॅनेज करू इच्छित आहात? तर PNB MySalary Account उघडा. याशिवाय वैयक्तिक अपघात विमा आणि यासह ओव्हरड्राफ्ट आणि स्वीप सुविधा मिळवा’.

ही सुविधा मिळवण्यासाठी असे करा –

  • तुम्हाला पंजाब नॅशनल बँकेत माय सॅलरी खातं सुरू करावं लागेल.
  • हे खातं 4 कॅटेगरीमध्ये देण्यात येत आहे- सिल्वर, गोल्ड, प्रीमियम आणि प्लॅटिनम.
  • हे खातं तुमच्या पे स्केलच्या हिशोबाने उघडण्यात येणार आहे.
  • अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही https://www.pnbindia.in/salary-saving-products.html या लिंकला भेट द्या.

या खात्याअंतर्गत ग्राहकांना 20 लाख रुपयांपर्यंतची मोफत विमा सुविधा देण्यात येत आहे. 10 हजार ते 25 हजार रुपये पगार असणाऱ्यांचे खाते सिल्ह्वर कॅटेगरी, 25001 ते  75000 रुपये पगार असणारे  गोल्ड कॅटेगरीमध्ये खातं उघडू शकता. 75001 रुपये ते 150000 रुपये पगार असणारे प्रीमियम आणि 150001 रुपयांपेक्षा जास्त पगार असणारे प्लॅटिनम कॅटेगरीमध्ये खातं मिळेल. अशी या बँकेची एक सुविधा नियोजीत करण्यात आली आहे.

ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी

विशेष म्हणजे तुम्ही हे खातं झिरो बॅलन्स असला तरीही उघडू शकता. शिवाय या ग्राहकांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी देखील मिळते आहे. यात सिव्ह्वर कॅटेगरीत असणाऱ्यांना 50 हजारांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, गोल्ड कॅटेगरीत 150000 रुपये, प्रीमियम कॅटेगरी 225000 आणि प्लॅटिनम केटेगरी  300000 रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!