Share

टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव ; ECBचा धक्कादायक निर्णय!

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : गेल्या काही दिवसापासुन भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने डब्ल्युटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळल्यानंतर काही काळासाठी भारतीय संघ सुट्टीवर गेला होता. यानंतर आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ विलगीकरणात पोहोचणार होता, मात्र यादरम्यान दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण झाली अशी धक्कादायक माहिती समोर आली.

कोरोनाची लागण झालेल्या दोन भारतीय क्रिकेटपटुपैकी एक खेळाडू हा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत हा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर थ्रो-डाऊन एक्सपर्ट दयानंद गरानी यांना कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या संपर्कात आलेला दुसरा यष्टिरक्षक रिद्धीमान साहासह गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व पर्यायी सलामीवीर अभिमन्यू इस्वरन या सर्वांनाही विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे.

पाकिस्तान विरुद्धच्या वन-डे मालिकेपूर्वी इंग्लंड टीममधील सात जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला संपूर्ण टीम बदलावी लागली होती. इंग्लंडमध्ये कोरोना पेशंट्सचं प्रमाण रोज वाढत असताना देखील इसीबीनं एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट मालिकेसाठी बायो-बबल कडक न करण्याचा निर्णय इसीबीनं घेतला आहे. या काळात खेळाडू हॉटेलच्या बाहेर वर्कआऊट करु शकतील. त्याचबरोबर त्यांना कुटुंबीयांना भेटण्याची देखील परवानगी देण्यात आली आहे.

इसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅरीसन यांनी या विषयावर बोर्डाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ कोरोनाची परिस्थिती गेली सहा महिन्यांपेक्षा  वेगळी आहे. या परिस्थितीबरोबर आपल्याला आता जगणं शिकलं पाहिजे. तसेच खेळाडूंवर बायो-बबलचामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. कोरोनाचा सामना कसा करायचा हे आता आपल्याला शिकायला हवे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!