मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यासाठी आपल्या विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून कमालीची सावधानता बाळगण्यात येत आहे. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा अध्यक्षपदाचे पद सध्या महाराष्ट्रात रिक्त आहे. अध्यक्षपदाची निवडणूक नागपूर अधिवेशनाच्या कालावधीमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी असलेल्या मतदानाच्या नियमावलीत बदल करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
विधिमंडळ कायदे समितीची बैठक नुकतीच झाली असून अधिवेशन कालावधीमध्ये यासंदर्भात प्रस्ताव आणून तो मंजूर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्याच्या नियमावलीनुसार जर विधानसभा अध्यक्षपदासाठी मतदान घ्यायचे ठरले तर गोपनीय करावे असा नियम आहे. पण गोपनीय मतदानामध्ये दगाफटका होऊ शकतो हे लक्षात घेत मूळ कायद्यातच बदल करत नवीन खुल्या किंवा आवाजी मतदानानं मतदान घ्यावे असा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
यावर आता विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर.’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने ?, महाविकास आघाडीचा सावध पवित्रा
- ट्वीटरवर अंकुश आणून लोकांचा बोलण्याचा अधिकार काढून घेणे योग्य नाही – नवाब मलिक
- अलिबाग उरण मतदार संघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन
- कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून चिंता व्यक्त
- पंतला कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयला आली जाग, खेळाडुंना दिले ‘हे’ आदेश


